सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दि. 24 डिसेंबर रोजी एस डी सह्याद्री पब्लिक स्कूल मध्ये ख्रिसमस डे उत्साहात साजरा करण्यात आला.
मुलांच्या आनंदातच कार्यक्रमाचा खरा आस्वाद लपलेला असतो त्याचप्रमाणें, छोट्या बालगोपाळांनी ख्रिसमस डे निमित्त वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर केली. सारिका कोंडे व साजिद शेख या शिक्षकांनी ख्रिसमस डे विषयी मुलांना माहिती सांगितली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील अनन्या अहिवळे व साक्षी भंडलकर या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन सांस्कृतिक विभागातील सर्व शिक्षकांनी केले होते. ख्रिसमस डे निमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या वेळी समर्थ ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक श्री अजिंक्य सावंत ,धनश्री सावंत ,सह्याद्री पब्लिक स्कूलचे प्राचार्य अजित वाघमारे, उपप्राचार्या अनुराधा खताळ, किशोरी काकडे, सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.