सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथील व विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल , सीबीएसई वाघळवाडी येथील इयत्ता नववी मध्ये शिकणारा विद्यार्थी यशवंत महेंद्र काकडे याची उत्तरप्रदेश (वाराणसी) येथे होणाऱ्या सतरा वर्षाखालील भालाफेक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेची प्रथम फेरी कोल्हापूरमध्ये संजय घोडावत विद्यालयात ॲथलेटिक्स 'क्लस्टर लेवल' येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेत यशवंतने द्वितीय स्थान पटकावले . सदर स्पर्धेची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा 1/02/2023 ते 4 /02/2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
शाळेचे प्राचार्य सचिन पाठक यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन केले. शाळेतील क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजीत देशमुख यांचे बहुमूल्य मार्गदर्शन स्पर्धकाला लाभले.