सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा डाव्या कालव्यावर सद्या अस्तरीकरण सुरू असल्याच्या चर्चा चालू असून कोणत्याही प्रकारचे अस्तरीकरण होणार नसून कळाव्यावरील सुरू असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूस धोबीघाट व जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.
याबाबत श्री. जगताप व श्री. होळकर यांनी आज वाणेवाडी येथे कालव्यावर सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते सोमेश्वर रिपोर्टर शी बोलत होते. ते पुढे म्हणाले, आज वाणेवाडी या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेची सभा असताना या सभेत काही शेतकऱ्यांनी अस्तरीकरण सुरू झाले की काय? अशी शंका उपस्थित केली. मात्र वर जगताप पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी पूल आहेत अशा ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूला जनावरांसाठी व महिलांसाठी घाट केले जाणार आहेत. पूर्वीचे पुलाच्या दोन्ही बाजूला असलेले जुने दगडी बांधकाम काढून नवीन आरसीसी मध्ये हे घाट उभारले जाणार आहेत. वाणेवाडीच्या पुलासह हांडेपूल व मळशी पूल याठिकाणी देखील आशा प्रकारचे बांधकाम केले जाणार आहे.
मात्र ज्याठिकणी लोकवस्ती नाही अशा पुलांच्या बाजूला हे बांधकाम केले जाणार आहे. याबाबत लोकांनी अस्तरीकरणाबाबत कोणताही गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.