भोर ! बसस्थानकात दुचाकीला एसटी बसची धडक : दुचाकीस्वार गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर बसस्थानकात प्रवासी सोडून वळण घेत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला एसटी बसची धडक बसल्याने दोन दुचाकीस्वार शनिवार दि.१४ दुपारच्या वेळी जखमी झाले.त्यातील एक गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
     भोर शिरवळ भोर एमएच ०६ एस ८२८९ ही एसटी बस शिरवळ हून प्रवाशी घेवून भोर बस स्थानकात आली असता प्रवासी सोडून वळण घेत होती.याचवेळी समोरून येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांची दुचाकी समोरून आली असता दोन्ही वाहनांची धडक होऊन दुचाकीवरील चालक याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. तर पाठीमागे बसलेल्या किरकोळ जखमी झालेची घटना घडली. दुचाकीवरील जखमी विद्यार्थ्यास खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-------------------
भोर बसस्थानक दुचाकी,चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा अड्डा-----------
भोर बस स्थानकाला चारही बाजूने कंपाउंड असले तरी बस स्थानकाच्या परिसरात खाजगी गाड्यांची पार्किंग मोठ्या प्रमाणावर होत असते.यामुळे बसस्थानक खाजगी दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा अड्डा बनला आहे. बस स्थानकाच्या आवारात खाजगी गाड्या पार्किंग केल्याने अपघात वाढले खाजगी गाड्यांच्या पार्किंगकडे  भोर आगाराचे अधिकारी नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.

To Top