सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण साप्ताहीक सुरू केल्याचा दिवस म्हणून मराठी पत्रकारदिन साजरा करन्यात येतो.पारदर्शक,भरवशाचे ,विश्वासार्ह लीखाण करून वाचकांसमोर वस्तूनिष्ट आणी वास्तव मांडले जाते ,अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करीत असतात म्हणूनच लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार असल्याचे प्रतिपादन जेष्ट पत्रकार पुरूषोत्तम मुसळे यांनी केले.
भोर येथील विद्या प्रतिष्ठानचे भोर इंग्लिश मीडियम स्कूल भोलावडे ता.भोर येथे सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील पत्रकारितेत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून सत्कार- सन्मान करण्यात आला यावेळी मुसळे बोलत होते. कार्यक्रम प्रसंगी भूगोल दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प प्रदर्शित केले होते याची पाहणी पत्रकार यांनी केली. यावेळी जेष्ठ पत्रकार भुजंगराव दाभाडे, विजय जाधव, सूर्यकांत किंद्रे ,संतोष म्हस्के, कुंदन झांजले, अर्जुन खोपडे, विलास मादगुडे, स्वप्निल पैलवान, हेमंत खंडाळे,विद्यालयाचे मुख्याध्यापक अश्विनी मादगुडे, उपशिक्षक अस्मिता कापरे, निवृत्ती खोपडे,मंगेश घोणे, रूपाली जाधव, राघीणी भोसले ,रवीका गवंडी, दिपाली भोसले, आदींसह शिक्षक व शिक्षकेतर वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.