सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याने वाढीव शेअर्स प्रति एकर एक शेअर्स ऐवजी प्रति दोन एकर एक शेअर्स यानुसार आणि वाढीव शेअर्स रक्कमेची कपात किमान तीन हप्त्यात कपात करून या जुलमी कपाती मधून सभासदांची सुटका करावी अशी मागणी पुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती दिलीप खैरे यांनी केली आहे.
याबाबत खैरे यांनी कारखान्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आपल्या कारखान्याने मागील हंगामात १५ हजार रुपये प्रति शेअर्स या नुसार भागातील वाढीव निधी जमा करण्यासाठी काही रक्कम सभासदांच्या ऊस पेमेंट मधून कपात केलेली असून उर्वरित या हंगामात कपात करणानार आहात, सोबतच कारखान्याचे डिसलरी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे म्हणून मागील तीन हंगामातील ऊस लागवडीची सरासरी काढून प्रति एकर एक शेअर्स यानुसार सभासद शेतकऱ्यांना कपातीचे पत्र देऊन आपण चालू हंगामातील ऊस पेमेंट मधून एक रकमी शेअर्स ची रक्कम कपात करीत आहात. वास्तविक ज्या डीसलरी, इथेनॉल प्रकल्पासाठी म्हणून आपण भाग भांडवल उभारणी साठी कपात करीत आहात त्याबाबत साखर उद्योगाला आर्थिक अडचणीत मदत करणारे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र जी मोदी यांच्या सरकारने स्वगुंतवणुक फक्त ५ टक्के इतकीच माफक करावी लागेल अश्या प्रकारचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे त्यामुळे आपल्या कारखान्याला या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारणी साठी अश्या प्रकारे जुलमी एक रकमी कपात करून निधी उभारणीची आवश्यकता नाही याबाबत आपण आपल्या स्तरावर सभासद शेतकऱ्यांना मागणी न करता आपण हा निर्णय मागे घ्याल अशी अपेक्षा होती पण आपण याबाबत निर्णय घेत नसल्याने यावर्षी ऊस उत्पादन घटले आहे, सभासद आर्थिक अडचणीत आहेत अश्यावेळी शेअर्स कपात आणि सोसायटी, बँक कर्ज वसुलीची होणारी कपात यामुळे शेतकरी पुढील हंगाम पूर्व तयारी आणि आपल्या नियमित गरज पूर्ण करणे अशक्य होणार आहे म्हणून या हा निर्णय अन्याय कारक असल्याचे वाटते म्हणून या पत्राद्वारे आपणास विनंती करतो की वाढीव शेअर्स प्रति एकर एक शेअर्स ऐवजी प्रति दोन एकर एक शेअर्स यानुसार आणि वाढीव शेअर्स रक्कमेची कपात किमान तीन हप्त्यात कपात करण्याचं धोरण जाहीर करून सभासदांना दिलासा द्यावा ही विनंती