पुरंदर ! बा. सा. काकडे विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शन संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
प्रतिनिधी : शिवाजी काकङे   
पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथील श्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विद्यालयात शालेय अंतर्गत  विज्ञान प्रदर्शन  संपन्न  झाले ग्रामीण  भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवङ निर्माण व्हावी त्याच्या कलागुणांना वाव मिळावा  या हेतुने विद्यालयाने  विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. 
           या प्रदर्शनात  ५०  विद्यार्थ्यांनी  वेगवेगळ्या विषयांवर  प्रयोगाचे सादरीकरण केले होते  यामध्ये प्रामुख्याने  सौर उर्जा  निर्मिती वीज  ,तसेच  आरोग्य व  स्वच्छता, तसेच पर्यावरण अनुकुल सामुग्री वाहतुक/नवोउक्रम , पर्यावरणीय चिंता , तसेच आमच्यासाठी गंणित , या विषयांवर  विद्यार्थ्यांनी नाविण्यपुर्ण  प्रयोग तयार केले होते या प्रदर्शनाचे उदघाटन पिंपरे गावाचे संरपच राजेंन्द्  थोपटे  उपसंरपच नंदाताई थोपटे  तसेच  संस्थेचे उपाध्यक्ष   भिमराव  बनसोङे ,संस्थेचे मानद सचीव मदनराव काकङे ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महादेव माळवदकर,तसेच मोठ्या संख्येने  गावातील ग्रामस्थ उपस्थित होते  या कार्यक्रमासाठी विज्ञान  शिक्षक मधुकर झगङे अमोल शिन्दे  ,तसेच  तेजस्विनी थोपटे ,यांनी परीश्रम  घेतले या उदघाटनाचे प्रस्ताविक  विद्यालयाचे मुख्याध्यापक नेवसे कैलास यांनी केले  व सुञसंचालन बुनगे दताञय यांनी केले  आभार प्रदर्शन विकास पवार यांनी केले.
To Top