सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या संचालकपदी पुणे जिल्ह्यातून सुनील थोपटे तास.भोर यांची बिनविरोध निवड झाली.थोपटे यांचे भोर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
थोपटे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज भोर ठिकाणी कार्यरत असून राज्यातील १३ जिल्ह्यातील २ हजार ५०० पेक्षा जास्त सभासद असणाऱ्या पतसंस्थेचे कोल्हापूर हे मुख्य कार्यालय असून तासगाव, कराड ,सातारा ,उस्मानाबाद ,सासवड , पेण या ठिकाणी सहा विभागीय कार्यालयातून पतसंस्थेचे काम चालते. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, सहसचिव प्राचार्य सिताराम गवळी,विद्या समितीचे अध्यक्ष अरुण सुळगेकर ,प्राचार्य बाळासाहेब वाघ (भोर) तसेच संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी यांनी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सहकार्य केले.थोपटे यांचा नगराध्यक्षा.निर्मला आवारे,विठ्ठल शिंदे, गजानन शेटे, राजाभाऊ शिंदे तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण शिवतरे, बाळासाहेब थोपटे यांनी सत्कार सन्मान केला.