पुरंदर-दौंड तालुक्यासह जिल्ह्यातील १३ अनाधिकृत शाळांवर कारवाई ? व्यवस्थापकासह मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पुणे : प्रतिनिधी
शहर आणि जिल्ह्यातील विविध तालुक्यांत १३ अनधिकृत शाळा सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. विनापरवाना सुरू आसलेल्या अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापकांसह मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
         जिल्ह्यांत अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या तीस शाळा बंद झाल्या आहेत. त्यासंदर्भात अहवाल
गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यापैकी काही शाळा मूळ परवानगीचे ठिकाण सोडून अन्यत्र भरत होत्या. यासह इतर शाळांना शासनाची परवानगी नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. चार शाळांकडून चार लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
       हवेली तालुक्यातील किरकटवाडी, लोणीकाळभोर, आंबेगाव बुद्रुक; तसेच मुळशी तालुक्यातील उरवडे, बावधन, हिंजवडी, जांभे-सागवडे, दत्तवाडी या ठिकाणच्या आहेत. दौंड तालुक्यातील दौंड, कासुर्डी, लिंगाळी रोड आणि पुरंदर तालुक्यातील वीर येथील इंग्रजी माध्यमाच्या १३ अनधिकृत शाळांचा यात समावेश आहे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
To Top