सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भोर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजवाडा चौक येथील कचेरीसमोर घोषणाबाजी करीत निषेध आंदोलन केले.
आंदोलनकर्त्यांनी आंदोलनापूर्वी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने अजित पवार यांचे विरोधात जोरदार जाहीर निषेध व्यक्त केला.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष जीवन कोंडे,जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य बाळासाहेब गरुड,शहराध्यक्ष सचिन मांडके, ॲड. कपिल दूसंगे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमर बुदगुडे ,संतोष लोहकरे, राजाभाऊ गुरव ,महिला आघाडीच्या लता अंबडकर, निलेश कोंडे, अभिजीत कोंडे, सुनील पांगारे, सुधीर शेळके ,अमर ओसवाल ,अजय जाधव, विनोद चौधरी ,दीपक मालुसरे, विजय निगडे, किसन वाडकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी अजित पवार यांनी शिवशंभो प्रेमींची माफी मागितली नाही तर यापुढे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी दिला.