सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गडदरवाडी(ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर भीमराव गडदरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच मालन गडदरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी(दि.४) रोजी झालेल्या बैठकीत गडदरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड झाली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे यांच्या नेतृत्वाखाली गडदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच्या सर्व ८ सदस्य मोठ्या फरकाने निवडून आले होते. मंडल कृषी अधिकारी एस. एम. बोराटे, ग्रामसेविका सीमा गावडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.यावेळी सदस्य संतोष गडदरे, राहुल लकडे, सीमा गंलाडे, स्वाती गडदरे, वनिता हाके उपस्थित होते. यावेळी भगवान मदने, विक्रम काकडे, शिवाजी गडदरे, धनंजय गडदरे, बापुराव गडदरे, शकंर महानवर भाऊसाहेब गलांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सागर गडदरे यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वरचे संचालक अभिजीत काकडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.