सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोरटेवाडी(ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आश्विनी योगेश कर्चे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचीत सरपंच भारती सोरटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच निवडीत अश्विनी कर्चे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे यांच्या नेतृत्वाखाली सोरटेवाडी ग्रामविकास पॅनलचे सदस्य श्रीपाल सोरटे, महेंद्र शेंडकर, रंजित सोरटे, अमोल सोरटे, मंदाकिनी सोरटे, अर्चना मासाळ, रेश्मा सोरटे, राणी खोमणे यांनी आपल्या सदस्यपदाचा कार्यभार यावेळी स्वीकारला.
यावेळी सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, ज्येष्ठ नेते विजयकुमार सोरटे, सोमनाथ सोरटे, माजी सरपंच दत्तात्रय शेंडकर, माजी उपसरपंच विलास पवार, जनार्दन सोरटे, तानाजी सोरटे, राजेंद्र कर्चे, रमाकांत सोरटे, मधुकर सोरटे, ज्ञानदेव सोरटे, सुशांत सोरटे, सुरेश मासाळ, संतोष गोडसे गणेश कर्चे, अंकुश गोरे, सोमनाथ देशमुख उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. व्ही. गायकवाड व ग्रामसेविका म्हणून जे. जे. काळभोर यांनी कामकाज पाहिले.
COMMENTS