सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथे शुक्रवारपासुन ( दि. ६ ) तीन दिवस व्याख्यानमाला होत आहे.
येथील जीवन साधना फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ग्रामस्थ व दानशूर यांच्या सहकार्याने प्राजक्ता मतिमंद विद्यालयाच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे नववे वर्ष आहे.
या संस्थेच्या प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयाची प्रेरणा असलेल्या कै. प्राजक्ता सुपेकर स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम रात्री साडेसातच्या दरम्यान प्राजक्ता मतिमंद शाळेच्या आवारात होणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे, सचिव डॉ. श्रीप्रसाद वाबळे यांनी दिली.
शुक्रवारी (दि.६) कल्पनाताई दुधाळ, कवियत्री यांचे शेती, माती आणि कविता या विषयावर बारामती येथील आभाळमाया ग्रुपच्या अध्यक्षा अल्पा भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान होणार आहे. शनिवारी (दि.७) सिद्धार्थ खरात सहसचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांचे शिक्षण, समाजसुधारक आणि सामाजिक परिवर्तन या विषयावर महाराष्ट्र शासन लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान होणार आहे. रविवार (दि.८) सु. ल. खुटवड यांचे विनोदाचे जीवनातील स्थान या विषयावर राजेंद्र खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान होणार आहे.
तर सोमवारी २३ जानेवारी २०२३ रोजी हिंदवी स्वराज्याचे संकल्पक श्रीशहाजीराजांच्या पुण्यतिथीनिमित्त देहु येथील संत तुकाराम महाराज पादुका स्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रा. प्रदिप कदम यांचे स्वराज्य संकल्पक श्री शहाजीराजे भोसले या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक स्त्रोत्यांनी या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
---------------------------------------