भोर ! संतोष म्हस्के ! दोनशे एकर शेती नापीक झालीय....! प्रपंच्याच वाटोळं होताना आता उगड्या डोळ्यांनी पाहवत नाही....नांदगावचे खडी क्रेशर कोणी बंद करेल का? .....संतप्त शेतकऱ्यांची शासनाला आर्तहाक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
गेले आठ ते दहा वर्षांपासून भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील नांदगाव येथे खडी क्रेशर मोठ्या जोमाने सुरू आहे. खडी क्रेशरमुळे नांदगाव मधील शेतकऱ्यांची २०० एकर शेती नापीक झाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.यामुळे खडी क्रेशर कोणी बंद करेल का अशी संतप्त शेतकऱ्यांनी शासनाला आर्त हाक दिली असून शासन यावर काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
             खडी क्रेशरमुळे शेतकरी हवालदिल झाले असून अनेक शेतकऱ्यांची शेती धुळीमुळे नापीक झाली आहे.अनेकांच्या घरांच्या भिंतींना खडी क्रेशरवर ब्लास्टिंग उडवल्यामुळे तडे गेले आहेत.तर नांदगाव ता.भोर येथील बहुतांशी नागरिकांना खडी क्रेशरच्या धुळीमुळे श्वसनाचे त्रास वाढू लागले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.लवकरात लवकर शासनाने योग्य ते निर्णय घेऊन खडी क्रेशर बंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असेही शेतकरी म्हणाले.
To Top