सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ : चंद्रकांत भाट
रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत गरजूंना मदत करून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या आदर्शवत कार्याचा सर्वांनाच अभिमान वाटतो असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिगड्डे यांनी केले
शिरोळ पोलीस ठाणे व शिरोळ शहर पत्रकार संघाच्या वतीने लोकवर्गणीतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीच्या वतीने २५ हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली तसेच संस्थेचे सदस्य व माजी नगरसेवक शरद उर्फ बापू मोरे यांनी १० हजार रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत सुपूर्द केली या या समारंभात पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे बोलत होते
शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील सचिव दगडू माने यांनी आपल्या मनोगतात शहरातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था आर्थिक मदत करीत असल्यामुळे लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या उपक्रमास बळ मिळत आहे रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी ही सामाजिक संस्था नेहमीच विधायक कार्यात पुढाकार घेते गरजूंना मदत करते त्यांचे कार्य सर्वांनाच आनंदित करते या विधायक कार्याला मदत केल्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले
या समारंभास रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे सचिव संजय तुकाराम शिंदे ट्रेझरर तुकाराम पाटील सदस्य संजय पाटील काशिनाथ भोसले संजीव पुजारी संजय रामचंद्र शिंदे आप्पालाल चिकोडे विराजसिंह यादव अतुल पाटील राहुल यादव भरत गावडे विवेक फल्ले सचिन सावंत संदीप कांबळे श्रीकांत जाधव शरद उर्फ बापू मोरे परशुराम चव्हाण सूचितकुमार माने उल्हास पाटील डॉ उमेश कळेकर डॉ अजितकुमार बिरनाळे अनिकेत जोशी अमोल चव्हाण गजानन पाटील विजय पाटील आत्माराम मुळीक रणजीत जगदाळे महेश माने सुभाष भंडारे राहुल माने शिवाजी कोळी पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुरणे पत्रकार बाळासाहेब कांबळे सामाजिक कार्यकर्ते भाग्योदय ढवळे फुलकेश कांबळे समर्थ शिंदे याच्यासह मान्यवर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते पत्रकार चंद्रकांत भाट यांनी आभार मानले