सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात एक वर्षात लाचलुचपत विभागाने ३ बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असतानही लाच घेण्याचे प्रकार सुरू आहेत. लाचलुचपत विभागाचे कारवाई सत्र सुरू असतानाच सोमवार दि. ७ पंचायत समितीतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या बड्या अधिकाऱ्यास लाच लुचपत विभागाने कारवाई करून रंगेहात पकडल्याची घटना घडली.
या घटनेमुळे लाच मागण्याचे प्रकार भोर तालुक्यात सुरूच असून शासकीय अधिकारी कर्मचारी लाच मागण्यात निर्ढावलेले असल्याचे समोर येत आहे.