भोर ! एका वर्षात तीन बड्या अधिकाऱ्यांनी लाच घेऊन अब्रू घालवून घेतली....आता पाणीपुरवठा उपअभियंता जयंत ताकवले याने तर बिलाच्या दोन टक्केप्रमाणे ७० हजार लाच घेतली

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर - संतोष म्हस्के
भोरला लाचलुचपत विभागाचे कारवाई सत्र सुरूच
पंचायत समितीच्या पाणीपुरवठ्याच्या उपअभियंत्यास लाच घेताना पकडले
          भोर तालुक्यात एक वर्षात लाचलुचपत विभागाने ३ बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असतानही लाच घेण्याचे प्रकार सुरू आहेत. लाचलुचपत विभागाचे कारवाई सत्र सुरू असतानाच सोमवार दि. ७ पंचायत समितीतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या जयंत सोपानराव ताकवले उपअभियंता वर्ग १ तास.भोर जि.पुणे या अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाने कारवाई करून ७० हजार रुपये घेताना रंगेहात पकडल्याची घटना घडली.
           या घटनेमुळे लाच मागण्याचे प्रकार भोर तालुक्यात सुरूच असून शासकीय अधिकारी कर्मचारी लाच मागण्यात निर्ढावलेले असल्याचे समोर येत आहे.जयंत ताकवले यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे खरेदीचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून लोकसेवक जयंत ताकवले उपाभियंता यांनी ७० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार होती.तक्रारदार यांच्याकडे बिलाच्या दोन टक्के प्रमाणे ७० हजार रुपये लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना पंचायत समिती येथील कार्यालयात ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई मा. पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक  अमोल तांबे, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव ला. लु. प्र. विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रतिबंधक अधीक्षक यांनी केली. पुढील तपास युनिटचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करत आहेत.
To Top