बारामती ! पत्रकारितेच्या नावाखाली बोगस पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या लोकांवर कारवाई करा : मराठी पत्रकार संघांची मागणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर - प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मान्यताप्राप्त नसलेल्या बोगस स्वयंघोषित पत्रकारांवर कारवाई करण्याची मागणी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी केली आहे. 
            कोरोनाच्या कालावधीत अनेक लोक पत्रकार झाले. अनेकांनी स्वतःची अनधिकृत वेब न्युज पोर्टल व युट्यूब चॅनल काढले तर कुणी चक्क फेसबुकवर पत्रकार झाले. मात्र असे पत्रकारितेचे काडीमात्र ज्ञान नसणारे अनेक जण कॉपी पेस्ट बातमीदारी करत आहेत. शिवाय लोकांची दिशाभूल करणे, बातमी लावतो म्हणून धमकावणे, आर्थिक मागणी करणे, ब्लॅक मेल करणे, खाजगी चित्रीकरण करणे, हप्ते वसुली करणे, शासकीय कार्यालयात विना परवानगी चित्रीकरण करणे, गाड्या अडवणे यासारखे गैरप्रकार करत आहेत. त्यातून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना नाहक त्रास होत असून वर्षानुवर्षे काम करत असलेल्या पत्रकारांची अप्रत्यक्षरीत्या बदनामी होत आहे. 
    अशा गैरप्रकारे विरोधात बारामती तालुका मराठी पत्रकार संघाने पाऊल उचलले असून याबाबतचे निवेदन त्यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना दिले आहे. यावेळी बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी, सचिन वाघ, सोमनाथ लोणकर, सुनील जाधव उपस्थित होते.
To Top