सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : दि ७
होळ (ता. बारामती) येथील चंद्रभागा श्रीरंग होळकर (वय, ९०) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात् तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. होळचे माजी सरपंच आनंदराव होळकर यांच्या त्या आई, पंचायत समितीच्या माजी सदस्या मीनाक्षी होळकर यांच्या त्या सासू तर श्रीरंग बापुसो सोसायटीचे अध्यक्ष अमर होळकर यांच्या त्या आजी होत. विविध सामाजिक क्षेत्रात त्यांचा वावर होता. त्यांच्या निधनाने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.