सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
खंडाळा तालुक्यातील वाठार काॅलनी येथील हायस्कूलची मुलं शाळेत घेऊन जात असलेल्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना लोणंद शिरवळ रोडवरील शेडगेवाडी फाट्याजवळ घडली.
सदर स्कूल व्हॅन ही गॅसवर चालवली जात असल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. सदर व्हॅन मध्ये शेडगेवाडी येथील आठ ते दहा विद्यार्थी होते. व्हॅनने अचानक पेट घेतल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र या आगीत स्कूल व्हॅन मात्र संपूर्ण जळून खाक झाली आहे. या स्कूल व्हॅन चा चालक हा वाठार काॅलनी येथील हायस्कूलचाच शिपाई असल्याचे समजते आहे. या अपघाताने स्कूल व्हॅनच्या आणि विद्यार्थ्यांच्ये सुरक्षीतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.