सुपे परगणा ! सुपे येथील श्री शहाजी हायस्कुलच्या दहावीच्या मुलांचा अभिष्टचिंतन सोहळा : मान्यवरांनी उपस्थित राहत दिल्या शुभेच्छा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील शहाजी हायस्कुलच्या इयत्ता दहावीच्या मुलांचा अभिष्टचिंतन कार्यक्रम विद्यालयात संपन्न झाला. 
           या कार्यक्रम प्रसंगी मान्यवर आप्पासाहेब शेळके (सं. दुध संघ  बारामती), श्री. गणेश चांदगुडे (माजी संचालक  सोमेश्वर सह. सा. का.), ज्ञानेश्वर बापू कौले (माजी जि.प. (सदस्य), नितिन दादा खैरे (जगदंबा अर्थमुव्हर्स अॅन्ड डेव्हलपर्स) राजेंद्र लव्हे पो. पाटील, नितिन नगरे- सामाजिक कार्यकर्ते  मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धा वाढीस लागावी म्हणून मुले मुली १० वी व १२ वी मध्ये प्रथम तीन- क्रमांक मिळविणाऱ्यांना प्रत्येकी १११५१/-(प्रथम) ७१५१/- (द्वितीय), ५१५१- (तृतीय) अशी रोख रकमेची बक्षिसे नितिन खैरे व हनुमंत शेळके यांनी त्यांच्या वतीने विद्यालयास जाहिर केली. व मुलांच्या खाऊ साठी सहा हजार रुपयांची देणगी शाळेला दिली. या कार्यक्रमास जेष्ठ अध्यापक  बनसोडे आर.बी अध्यक्ष म्हणून लाभले. याप्रसंगी गणेश चांदगुडे यांनी मुलांना यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, शून्यातून विश्व निर्माण करावे लागते. त्यासाठी सतत प्रयत्नशील रहा असा मौलिक सल्ला दिला. मा. ज्ञानेश्वर कौले यांनी मुलांना जिवन जगत असताना नैतिकता साभांळा असा संदेश दिला. तर अध्यक्षिय भाषणात श्री बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेची नवनविन क्षितिजे तुमच्यासाठी साद घालत आहेत त्यासाठी 'सज्ज रहा असा सल्ला दिला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन गायकवाड एम.एस यांनी केले.
            या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन कला अध्यापक  लोणकर ए.एस यांनी केले. संदरचा कार्यक्रम मुख्याध्यापक जाधव व्ही. बी, उपमुख्याध्यापक गोवेकर वाय. एस. पर्यवेक्षक  भालेराव बी.के यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन खोमणे एस.ए यांनी केले.
To Top