सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी (मळशी) येथील वीरशैव तिराळी लिंगायत समाज महाराष्ट्र राज्याचे मा. सदस्य तुळशीराम बळवंतराव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते ८५ वर्षांचे होते.
त्यांनी येथील सोमेश्वर कारखान्यात ३५ वर्षापेक्षा अधिक काळ शेतकी विभागात नोकरी केली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई सुना व नातवंडे असा परिवार आहे. ज्योतिबा सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण काकडे यांचे ते मोठे बंधू होत. अंत्यविधी मळशी येथे सायंकाळी पाच वाजता होईल.