बारामती ! हेमंत गडकरी ! वन विभागाला जाग कधी येणार ? आणखी एका चिंकाराचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
मुढाळे ( ता. बारामती ) येथील वन क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आणखी एका चिंकारा जातीच्या मादी हरणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बारामती वन विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 
मुढाळे येथील वन क्षेत्रात सातत्याने वन्य जीवांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला होण्याच्या घटना घडत आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिंकारा जातीच्या हरिणांचे वास्तव्य आहे. मात्र वन विभागाच्या अनास्थेमुळे येथील वन्य जीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. येथील वन क्षेत्र  ग्राउंड बनले आहे. वनक्षेत्राच्या आसपास मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यवसाय असल्याने मृत कोंबड्या वन क्षेत्राच्या परिसरात टाकल्या जातात. त्यामुळे त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. याशिवाय वनक्षेत्रातील पाणवठे गळके असल्याने वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध होत नाही. वन क्षेत्रात वणवा लागल्याने प्राण्यांना चारा उपलब्ध नाही. शिवाय त्यामुळे हे वन्यप्राणी अन्नाच्या व पाण्याच्या शोधात असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला होतो. मागील काळात अशा घटना घडल्या आहेत. मात्र यावरूनही वनविभागाने कोणताच धडा घेतलेला दिसत नाही. 
याबाबत बोलताना वन्यजीव प्रेमी जमीर मुजावर म्हणाले की आम्ही बऱ्याचदा भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून हरिणांची सुटका करत असतो. मात्र याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले असता त्यांच्याकडून उलट उत्तर मिळते. मागील काळात आम्ही स्वखर्चाने वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. मात्र वन विभागाकडून आम्हाला अपेक्षित सहकार्य भेटत नाही. वनक्षेत्रात काही गैरप्रकार सुरू असल्याचे आमच्या लक्षात येतात आम्ही तत्काळ वन विभागाला कळवतो. मात्र वनविभागाचे अधिकारी आमच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असतात. कदाचित त्या दिवशी वन विभागाचे अधिकारी लवकर आले असते तर त्या चिंकाराचा जीव वाचला असता.
---------------------
बारामतीच्या वन क्षेत्रात चोहीकडे वणवा 
मागील काही दिवसात बारामती येथील पूर्वी नियोजित बिबट सफारी पार्क येथे वणवा लागून वण संपदा जाळून नष्ट झाली होती. शिवाय तालुक्यात अनेक ठिकाणी वनक्षेत्रात वणवा लागल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे वन विभागाने जाळ पट्ट्या नेमक्या काढल्यात कशा असा सवाल उपस्थित होत आहे.
........

To Top