वडगाव निंबाळकर मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी ! जाणता राजा युवा प्रतिष्ठान शिवजयंती महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
निंबाळकर : सुनील जाधव 
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला.वडगाव निंबाळकर मध्ये जाणता राजा युवा प्रतिष्ठान तर्फे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे उपस्थित होते. 
          तसेच चित्रकला स्पर्धा,क्रीडा स्पर्धा, लाठी -काठी प्रशिक्षण शिबीर, होम मिनिस्टर खेळ- पैठणीचा असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमास वडगाव प्रसिद्ध सर्व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन आनंद घेतला. श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान भगवा चौक आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. किल्ले शिवज्योत आणण्यासाठी 17 फेब्रुवारी रायगडावर अनेक तरुण  शिव ज्योत अन्यासाठी यावेळी जयेश ढवळे व सलीम भालदार या दोघांनी प्रत्येकी 26 किलोमीटर शिवज्योत घेऊन धावण्याचा विक्रम केला. भगवा चौक येथे संध्याकाळी लहान मुलांचा संस्कृतिक कार्यक्रम व श्री शिवछत्रपती महाराजांचे आरती व सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ संगीतादेवी राजेनिंबाळकर व राजेश्वरराजे राजेनिंबाळकर उपस्थित राहिले.आलेल्या सर्व शिवभक्तांसाठी महाप्रसाद जेवणाचा कार्यक्रम मंडळ तर्फे नियोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत जाधव,सुनील जाधव यांनी केले.नृत्य,भाषण, पोवाडा गवळण असे अनेक कला सादर करीत आले.सर्व परिसर शिवमय झाला होता. लहान मुलांचे सर्व कला पाहून सर्व शिवभक्त मंत्रमुग्ध झाले, मुलांना नृत्य शिकवणारे क्षीरसागर मॅडम, शुभम गावडे व कार्यक्रमासाठी भव्य असेल मैदान उपलब्ध करून देणारे ओमकार दरेकर यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. यावेळी शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित किल्ले स्पर्धा चे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक तेजस शितोळे, द्वितीय क्रमांक अथर्व पानसरे,तृतीय क्रमांक सचिन गाडेकर यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग कलाकारांना प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले. शिवजयंती उत्सव अतिशय शांत पद्धतीने व मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावली आणि सर्वांचेच प्रचंड प्रतिसाद यामुळे सर्वकडे चर्चा होत आहे.यावेळी आयोजक शिवछत्रपती प्रतिष्ठान भगवा चौक व लांमंनेश्वर तरुण मंडळ शिवक्रन्ति तरुण मंडळ,जय हनुमान तरुण मंडळ व सर्व वडगाव निंबाळकर पंचक्रोशीतील  ग्रामस्थ उपस्थित राहिले. यावेळी सर्व शिवभक्तांचे आभार मानण्यात आले कार्यक्रम संपन्न झाला.
To Top