सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
पुणे-सातारा महामार्गावरील वेळू ता.भोर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनचे नुकसान करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना चाकण (ता.खेड) येथुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पुणे येथील पथकाने अटक करून राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले.
एटीएम फोडणारे प्रणीत दयानंद गोसावी (वय २४ वर्षे, सध्या रा. धाडगेमळा, अथर्व पेंटसन बिल्डींग, चाकण, ता.खेड जि. पुणे मुळ रा. चिंचणी, ता. खटाव जि. सातारा), शुभम भाऊलाल नागपूरे (वय २२ वर्षे, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, नानेकरवाडी, चाकण ता. खेड जि. पुणे, मुळ रा. आष्टी ता. तुमसर जि. भंडारा), शुभम युवराज सरवदे (वय १९ वर्षे, रा. यशवंत कॉलनी नानेकरवाडी, चाकण ता. खेड जि पुणे, मुळ रा. नाका डोंगरी, ता. तुमसर जि भंडारा), आकाश मोडक नागपुरे (वय २२ वर्षे, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, नाणेकरवाडी, चाकण ता. खेड जि. पुणे), कार्तिक मुलचंद गौपाले (वय २१ वर्षे, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, नाणेकरवाडी, चाकण ता. खेड जि. पुणे, मुळ रा. आष्टी ता. तुमसर जि.भंडारा) अशी अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १६ फेब्रुवारीला पहाटेच्या वेळी वेळू ता.भोर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनचे नुकसान करून अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता.परंतु त्यांची चोरी अयशस्वी ठरल्याने त्यांनी तेथून जागेवरून चारचाकी मधून पलायन केले होते. याबाबतचा गुन्हाची नोंद राजगड पोलीस ठाण्यात झाली होती. स्थानिक गुन्हा शाखेच्या पुणे येथील पथकाने याबाबत तपास सुरू केला असता आरोपी चाकण येथील असल्याची खबर मिळाली होती.यानुसार पाच आरोपींना अटक केली असून राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स.पो.नि. महादेव शेलार, पो. उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार प्रकाश वाघमारे, पो. हवालदार अजित भुजबळ, राजू मोमीन, पो. ना. अमोल शेडगे, बाळा खडके,पो. शिपाई मंगेश भगत, अक्षय नवले, संदीप वारे यांनी केली.