पुरंदर ! मंदिर परिसरात जेलिटीनचा स्फोट.... मंदिर हादरले... गुळुंचे-कर्नलवाडी ग्रामस्थांची जेजुरी पोलिसात धाव : दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
गुळूंचे कर्नलवाडीसह चार गावच्या ग्रामस्थांचा विरोध असतानाही नियोजित खडिमशीन मालाकाचे काम सुरुच आहे. सोमेश्वरचे संचालक शैलेंद्र रासकर यांनी  नियोजित खडिमशीनच्या ठिकाणी जिलेटीनचा स्फोट उडवल्याने बोलाईमातेच्या प्रचिन गुहेत हदरे बसल्याने ग्रामस्थांनी जेजुरी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. 
       मंगळवार दि. १४ रोजी दुपारी ३:४५ वाजता गुळूंचे कर्नलवाडी गावच्या हद्दीत बोलाईमाता मंदिर परिसरातील नियोजित खडिमशीनच्या ठिकाणी विना परवाणगी स्फोट घडवल्याने ग्रामस्थांसह भाविक भयभीत झाले होते. देवीचा वार मंगळवार असल्याने यावेळी देवीचे पुजारी गणपत शंकर पुजारी व भक्त मधुकर नारायण पाटोळे त्याठिकाणी होते. त्यांनी लागलीच ग्रामस्थांना या स्फोटाबात सांगितले. स्फोटामुळे बोलाईमातेच्या गुफेच्या दर्शनीभागातील दगडांना हदरे बसले असल्याचे त्यांनी सांगितले. 
          जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीतील माहितीनुसार, गुळूंचे कर्नलवाडी गावच्या हद्दीतील नियोजित खडिमशीनल गावकऱ्यांचा विरोध वाढत आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध बोलाईमातेचे गुफेमधील देवस्थान आहे. दोन्ही गावातील ग्रामसभेत खडिमशीनला विरोधाबाबत ठरावही करण्यात आले आहेत. ग्रामस्थ आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहेत. तरही नियोजित खडिमशीन मालकांनी मंगळवार दिनांक १४ रोजी या क्षेत्रात ब्लास्टींगचा स्फोट करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवार हा बोलाईमातेचा वार असतो, दर मंगळवारी भाविक दर्शनासाठी येत असतात. स्फोट झाला तेंव्हा देवाचे पुजारी, सेवक व भक्त प्रचिन गुफेतच होते. त्यांना स्फोटाचे हादरे बसले असून, भिती निर्माण झाली. या स्फोटामुळे मोठ्याप्रमाणावर धुराचे लोट उडाला. 
         गुळूंचे, कर्नलवाडी, वाल्हे, सुकलवाडी, पिसुर्टी, थोपटेवाडी आदी ग्रामस्थांनाचा विरोध असतानही नियोजित खडिमशनचे मालक शेलैंद्र रासकर रा. खंडोबाचीवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे हे मुजोर पद्धतीने व कोणतीही परवानगी नसताना स्फोट घडवत असल्याने हे गैर आहे. या घटनेमुळे स्थानिक व भाविक प्रचंड दहशतीत आहेत. तरी या संबंधित आम्हा ग्रास्थांचा विरोध पाहता आमची शेलेंद्र रासकर यांच्या विरोधात तक्रार आहे असे म्हटले आहे.
To Top