भोर ! वीसगाव खोऱ्यातील डोंगर रांगांना वनवा : वनव्यात वनसंपत्तीचे नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम -----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोरे परिसरातील वरवडी,पाले,पळसोशी येथील डोंगर रांगांना मंगळवार दि.१४ सायंकाळच्या वेळी अज्ञातांकडून वनवा(आग) लागल्याने डोंगर रांगांमधील वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले.तर वणव्यात हजारो वन्यजीव होरपळून गेले.
     वन विभागाने डोंगर रांगांमधील जंगल वाढवण्यासाठी योग्य ते प्रयत्न केल्याने सध्या तालुक्यातील डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल वाढले आहे.यामुळे वनसंपत्ती तयार झाली असून वन्यजीवांची संख्या वाढली आहे.मात्र डोंगराला अज्ञातांकडून वनवे लावले जात असल्याने या वनव्यामध्ये वनसंपत्ती तसेच वन्यजीव होरफळून जात असल्याचे चित्र आहे.पाले,वरवडी,पळसोशी ता.भोर येथील डोंगराला आज्ञातांकडून लागलेली आग विझवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत होते.कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी आग विझवली  तर अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या.
To Top