सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
कोल्हापूर येथील उद्योजक व खंडोबा भक्त अमित पांडुरंग सावंत यांना दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने भक्ती भूषण पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पत्रकार संजय सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अमित सावंत हे दरवर्षी जेजुरी येथील खंडोबा मंदिरास भेट देत असतात, त्याचबरोबर गरजूंना कपडे वाटप चादरी वाटप तसेच अन्नदान व ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यास वारकरी भक्तांना अन्नदान असे विविध उपक्रम राबवतात ते अनेक देवस्थाना देणग्याही देत असतात, याबद्दल त्यांना भक्ती भूषण पुरस्कार दिल्याचे प्राचार्य नंदकुमार सागर यांनी सांगितले यावेळेस प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. सुमित काकडे ,पुरस्कार समितीचे सदस्य उद्योजक नगरसेवक रवीशेठ जोशी ,पत्रकार व मार्तंड देवस्थानचे माजी विश्वस्त प्रा. नितीनजी राऊत , प्रतिष्ठानचे सचिव प्रल्हादजी गिरमे आदी उपस्थित होते यावेळेस अमित सावंत म्हणाले आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून धार्मिक स्थळांना भेट देऊन सामाजिक कार्य करीत असतो. अमित सावंत यांना भक्ती भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.