माण ! बारामती-निंबुतच्या सृष्टीप्रिया ग्रुपचा 'डमरू' थकला... पण 'टारझन' आणि 'रुद्रा'ने कसर भरून काढत... मलवडीचं मैदान मारलं...!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
दहिवडी : प्रतिनिधी
मलवडी (ता. माण) येथे श्री बोलाई यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीला मोठा प्रतिसाद लाभला. १७३ बैलगाड्यांनी सहभाग घेतलेल्या या शर्यतीत बारामती तालुक्यातील निंबुत येथील सृष्टीप्रिया ग्रुपच्या  गौतम काकडे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. 
           अनेक वर्षांनंतर मलवडीत आयोजित या शर्यतीत नगर, पुणे, बारामती, सांगली, सोलापूर, सातारा येथील बैलगाड्यांनी मलवडी : येथील बैलगाडी शर्यतीच्य सहभाग घेतला. दोन ते सात क्रमांकाच्या विजयी गाड्या पुढीलप्रमाणे- अधिक मगर (मलवडी), सुलतान ग्रुप शिवराज ट्रेडर्स मलवडी यांनी दिली. (पेडगाव), धनश्री शेती फार्म (खटाव), स्वरा सागर पिसे (आटपाडी), राजवीर रूपनवर (सांगोला) व अन्विका म्हसकर (इंदापूर). प्रथम सात क्रमांकांसाठी रुपये ३१०००, २१०००, ११०००, ७०००, ५०००, ३००० व २०००, तसेच प्रत्येक विजेत्याला मानाची ढाल बक्षीस देण्यात आली. ही बक्षिसे श्री समर्थ बोलाईमाता मंडळ, सर्व बैलगाडा प्रेमी आंधळी व मलवडी, भारत फॅन क्लब मलवडी, रजत मगर, दादासो नवले, संतोष मगर (गुरुजी), शेतकरी हार्डवेअर मलवडी, बैलगाडी कमिटी, आंधळी व मलवडी, अधिक मगर व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट, शिस्तबद्ध मैदान आयोजित करून बैलगाडी मालकांची वाहवा मिळवली. या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे व बाबासाहेब पवार, सरपंच दादासो काळे, माजी सैनिक प्रल्हाद मगर, सतीश महाजन, नानासो मगर, संजय मगर, गणेश जगदाळे, मिलिंद खरात, बापूराव काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
To Top