धक्कादायक ! गुळुंचे-कर्नलवाडी येथील खडीक्रशर विरोधात उपोषण करणाऱ्या दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली : सासवड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सासवड : प्रतिनिधी
दोन दिवसांपासून खडिमशीन विरोधात उपोषणाला बसलेल्या १७ आंदोलकांपैकी दोन उपोषणकरत्यांची तब्बेत खालवली आहे असून पी.एल. निगडे व बाळू महानवर यांना सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
          गुळूंचे कर्नलवाडी परिसरातील नियोजित खडिमशीन विरोधात सहा गावातील १७ ग्रामस्थांचे आमरण उपोषण सासवड येथील दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर दोन दिवसांपासून उपोषण सुरु आहे. आज मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास दोन उपोषणकर्त्यांची तब्यत खालवली. दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. नियोजित खडिमशीन विरोधात गुळूंचे कर्नलवाडी परिसरातील सहा गावातील शेतकरी, मेंढपाळ व बोलाईमातेचे भक्त उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला बसलेल्या १७ आंदोलकांपैकी दोन उपोषणकर्त्यांची तब्बेत खालवली. पी.एल. निगडे व बाळू महानवर यांना सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना सलाईन लावले असून, इतर १५ उपोषणकर्ते दौंड पुरंदर उपविभागीय कार्यालयासमोर बसून आहेत.
To Top