सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सासवड : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे कर्नलवाडी परिसरातील नियोजित खडिमशीन विरोधात आमरण उपोषनाचा आज दुसरा दिवस. सह गावातील १७ ग्रामस्थांचा उपोषण सासवड येथील दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर काल सोमवार पासून उपोषण सुरु आहे. आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दोन उपोषणकर्तेची प्रकृती खालावली आहे.
नियोजित खडिमशीन शेजारील शेतात शेतकऱ्यांना कर्ज काढून पाईपलाईन केली आहे, ती शेती धोक्यात येऊ शकते, विहिरींचे पाणी जाऊ शक्ते,
नियोजित खडिमशीन मुळे राज्यभरात प्रसिद्ध असलेली प्राचीन गुहेतील बोलाईमाता मंदिर धोक्यात येउ शक्ते, स्थानिक मेंढपाळांच्या चाऱ्याचा प्रश्न उधभवू शक्तो तसेच परिसरातील शेत धोक्यात येऊ शक्ते या करणास्तव कर्नलवाडीचे मावळते सरपंच सुधीर निगडे, माजी सरपंच लक्ष्मण वाघापूरे, भागा महानवर, पिंपरेचे माजी सरपंच दादासाहेब खरात, बाप्पू महानवर, पी.एल.निगडे, अरुण निगडे, बिरा बरकडे, कृष्णराव निगडे, अमर निगडे, हणुमंत निगडे, भगवान पवार, निलेश निगडे, दादासाहेब वाघापूरे, रोहिदास पवार, बाळू महानवर, सदाशिव महानवर हे शेतकरी व बोलाईमातेचे भक्त उपोषण करत आहेत.
सोमेश्वरचे संचालक शैलेंद्र रासकर यांच्या खडीमशीनला गुळूंचे ग्रामपंचायतीने कोणत्याही लेखी परवानगी दिली नव्हती तरही कायद्याच्या पळवाटा काढत खडीमशीनसाठी शासकीय परवानग्या कशा काढल्या याबाबत गुळूंचे कर्नलवाडी ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. गुळूंचे ग्रामपंचायतीकडून पोल्ट्रीला वीज पुरवठा व्हावा यासाठी न हरकत दाखला मागीतल, त्या एका न हरकत दाखल्यावर वीज वितरणच्या खर्चाने सुमारे ५० नवीन पोल टाकून एक डी.पी. मंजूर करून घेतला. आता त्याच त्याठिकाणी पोल्ट्री न बांधता तीच वीज धोकेदायक खडिमशीनला रासकर वापरणार असल्याने उपोषणकर्ते ग्रामस्थांनी वीज वितरणच्या भुमिकेबाबत नाराज आहे. या नियोजित खडिमशीन शेजारी मेंढपाळांच्या चराऊ जमिनीवर खडिमशीने धुळीमुळे मेंढपाळांचे प्रशी निर्माण होऊ शक्तात. सोमवारी पुरंदर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्याकर्त्यांनी या उपोषणाला पाठिंबा देला. प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, नायब तहसिलदार रुतुजा मोरे, अव्वल कारकूण राहुल जगताप, हंसध्वज मनाळे या शासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलकांची सोमवारी संध्याकाळी भेट घेत चर्चा कली, पण आंदोलक उपोषणावर ठाम आहेत.
मंगळवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पुरंदर तालुक्यातील विविध गावच्या ग्रामस्थांनी उपोषणस्थळी भेट देतत उपोषणाला पाठिंबा देत आहेत. काल सोमवारी सायंकाळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारपर्यंत एक ही अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी ही डोकवून पाहत नसल्याने उपोषणकर्ते संतप्त झाले आहे. प्रशासनाने आमचा अंत पाहु नय, लवकरातक्षलवकर तोडगा काढावा अशी भावना उपोष्णकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. गेंड्याचे कातडे पांघरलेले प्रशासन मात्र कोणतीही दयामाया दाखवण्याच्या भुमिकेत नाही. उपोषणकर्तेही आपल्या भुमिकेवर ठाम असून नियोजित खडिमशीनचा परवाना रद्द केल्याशिवाय उपोषणस्थळ सोडणारच नाही या भुमिकेबाबत आहे.