वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रामचंद्र बबन जाधव सोमेश्वर विद्यालय मुढाळे येथे गेले तीस वर्षे कार्यरत होते, आज ते सेवानिवृत्त झाले. प्रामाणिक एकनिष्ठेने कर्तव्य पार पडत असताना जाधव मामा म्हणून त्याची सर्वत्र ओळख, कामामध्ये पारदर्शकपणा अगदी हसत-मुखत कोणतेही काम असून लहान- मोठे ते अगदी प्रामाणिकपणे करत,आपले कर्तव्य पूर्ण करत असताना त्यांच्या सेवानिवृत्त गौरव समारंभाचे आयोजन केले .
या कार्यक्रमाचे औचित साधून मुढाळे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने खुली व्यायाम शाळा व शाळेसमोरील पारंगणात पेवर ब्लॉकचे कामाचे उद्घाटन करण्यात आले. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे संचालक संभाजी होळकर, उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, सचिव सोमेश्वर प्रसारक मंडळ भारत खोमणे, सरपंच मुढाळे प्रिया वाबळे व सर्व संचालक सोमेश्वर साखर कारखाना, सोमेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक मंडळ, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. मुढाळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मित्रपरिवार पाहुणेमंडळ यांनी कार्यक्रमास हजेरी लावली. कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम करण्यात आले व नंतर वाघळवाडी येथील आश्रम शाळेस विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त जाधव यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले,'अन्नदान हे श्रेष्ठ दान 'असे सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम सोळा संपन्न झाला.