बारामती ! सह्याद्री पब्लिक स्कूल & ज्युनिअर कॉलेजमध्ये येथे भारत स्काऊटस/गाईडसचा १४ वा तीन दिवसीय वार्षिक मेळावा उत्साहात साजरा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय व बारामती शहर भारत स्काऊटस् आणि गाईडस् स्थानिक संस्था बारामती आणि सह्याद्री पब्लिक स्कूल वाघळवाडी यांच्या संयुक्त विद्यामाने सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षातील १४ वा  स्काऊट  गाईड जिल्हा मेळावा  दि.२५ ते २७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सह्याद्री पब्लिक स्कूल जुनियर कॉलेज 𝙲𝙱𝚂𝙴 वाघळवाडी ता. बारामती येथे आयोजित करण्यात आला होता.
           सदर मेळावा उदघाटन सोहळ्यास  मान्यवर श्री.डॉ. अनिल बागल गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती  तसेच संभाजी  होळकर-  संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे , अजिंक्य सावंत अध्यक्ष  समर्थ ज्ञानपीठ व ग्रामीण विकास संघटना सोमेश्वर नगर वाघळवाडी तसेच अजित वाघमारे प्राचार्य सह्याद्री पब्लिक स्कूल  जुनिअर कॉलेज 𝙲𝙱𝚂𝙴 वाघळवाडी, बारामती शहर स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर, कार्याध्यक्ष. किरण तावरे, गटशिक्षणाधिकारी.संपतराव गावडे सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट नबाब,  तसेच , उत्कर्षि माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा मुख्याध्यापिका रोहिणी सावंत मॅडम या मान्यवरांच्या  उपस्थिती मध्ये उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. मेळाव्याला ४५३ स्काऊट गाईड, स्काऊटर, गाईडर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
           मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, वाघमारे अजित ,स्काऊटर मंगेश खोमणे, कांबळे, सोनवणे सु.गो., ढोपरे, नबाब. हसीना शेख कुसुम जाधव, शहाजी वाघमारे,  रशिद पठाण (सोलापूर), सर्विस रोव्हर सोमनाथ यादव व शुभम चौधरी तसेच गटशिक्षणाधिकारी . संपत गावडे यांचे मोलाचे योगदान लाभले. स्काऊट गाईडच्या निरोप समारंभ दिवशी प्रमोद काकडे सभापती बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद पुणे , राजवर्धन शिंदे मा चेअरमन सोमेश्वर कारखाना,  किरण तावरे कार्याध्यक्ष स्काऊट व गाईड , महेश जगताप दैनिक लोकमत यांच्या उपस्थितीत पार पडला. 
To Top