सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील बावडा येथे अवैद्य बेकायदेशीर हातभट्टी दारू बाबत गोपनीय माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना प्राप्त झाली.
सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर स्टाफ असे मिळून प्रोहिबिशन रेड पथक रवाना केले. सदर पथकाने आज दि १ रोजी पहाटे ५ वाजता बावडा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या चार जणावर छापा करून मानवी शरीरास अपायकारक अशा रसायनाने भरलेले तीनशे लिटरचे बॅरल ३ नग , दोनशे लिटर १२ नग, शंभर लिटर १ नग व इतर साहित्य असा एकूण २ लाख ४९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई दरम्यान चौघे फरार झाले असून या चार जणाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र येथे सुरू आहे.
आगामी होळी, ग्रामदैवत यात्रा, जयंती उत्सव व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस यांच्याकडून अवैध धंद्यावरती धाडी टाकून धडक कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के बी शिंदे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, लखन साळवी पोलीस शिपाई विकास राखुंडे, विनोद काळे, समाधान केसकर यांनी मिळून केली.