पुरंदर ! ज्या दिवशी स्फोट घडला.. बोलाईमाता पुजाऱ्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे पुढे कथन केली हकीकत...

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे-कर्नलवाडी येथील नियोजित खडीमशीन च्या विरोधात गेली तीन दिवस ग्रामस्थ आमरण उपोषण करत आहेत. 
            पुरंदर चे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार यांनी पाहणी केली असून अहवाल गुरुवारी करणार असल्याचे सांगितले होते.  त्या अनुषंगाने आज बुधवारी दुपारी दीड वाजता पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत व वन विभागाचे अधिकारी यांनी त्या परिसराची पाहणी केली प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते तसेच निरा महावितरणचे अधिकारी त्याचबरोबर मंडल अधिकारी तलाठी आदी अधिकारी व पोलीस हजर होते.  नियोजित खडीमशीनचा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या परिसराची पाहणी सर्व अधिकाऱ्यांनी केली यानंतर बोलाई मातेच्या गुहेमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.  यादरम्यान पुजार्यांनी देवीचे महात्म्य व स्पोर्ट घडवल्या दिवशीचे सर्व हकीकत सांगितली या गोवेला प्राचीन इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले कर्नलवाडी चे माजी सरपंच सुधीर निगडे यांचे व त्यांच्या मुलीचे असलेले पॉलिहाऊस या संदर्भातही सुचिता निगडे यांनी आपले म्हणणे मांडले या परिसरात मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ वस्ती आहे मेंढपाळांनी आपली उपजीविकेचे साधन असलेल्या मेंढ्यांविषयी आपले म्हणणे मांडले. 
To Top