सोमेश्व रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
सुरुर येथे धावजी पाटील मंदिरात अघोरी करणी करणाऱ्या चार संशयितां विरोधात भुईंज पोलिसांनी केला गुन्हा दाखल
जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या बाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की महामार्गावर प्रसिध्द असलेल्या सुरुर तालुका वाई येथील धावजी पाटील मंदीरात दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाने मंदिरात एक मांत्रिक पांढरा शर्ट घातलेला खाली लुंगी घातली होती डोक्याला पांढरे कापड बांधलेला लांब केस व लांब दाढी आसलेल्या त्याचे समोर अनोळखी व्यक्तीस जमिनीवर बसवून समोर सुरू असलेला अघोरी उपचार व गुलालाचे रिंगणात ठेवलेले साहित्य, लिंबास टाचण्या टोचून त्यातील रस समोर बसलेल्या अनोळखी व्यक्तीच्य तोंडात ओतून, घाणेरड्या शिवीगाळ करून, भूत उतरविण्याचे अधोरी कृत्य करून त्यास मानसिक व शारीरिक इजा होईल असे वर्तन करत होता. याचे मोबाईल मधून रेकॉर्डिंग करून त्या द्वारे भुईंज पोलिसांत याची माहिती त्या भाविकाने दिली. त्यानुसार जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत चार संशयित ईसमाचे वर फिर्याद देत भुईंज पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणातील नेमकी सत्यता पडताळणीसाठी व त्या चार जणांना ताब्यात घेण्यासाठी भुईंज पोलीस रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी दिली.