भोर ! संतोष म्हस्के ! यूपी....बिहारचा विकास झालाय.... छे कसला विकास.....अल्पवयीन परप्रांतीय मुलांचे लोंढा आता भोरपर्यंत धडकले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यात अनेक दिवसांपासून परप्रांतीयांचा रोजगारासाठी लोंढाच्या लोंढा येत असून तालुक्यात परप्रांतीय आले किती गेले किती याची संबंधित विभागाकडे नोंद नसल्याने आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती तालुक्यात होऊन बसली आहे.
       तालुक्यात २५-३० च्या टोळक्याने परप्रांतीयांचे आठवडाभराच्या अंतराने येने -जाणे सुरू असले तरी  परप्रांतीयांना तालुक्याततील संबंधित विभाग हटकत नसल्याचे चित्र आहे.तालुक्यात सध्या ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर इमारतींची कामे सुरू असून रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीयांची ठेकेदारांकडे कोणत्याही प्रकारची नोंद नाही.तसेच अल्पवयीन मुलांना काम करण्याची बंदी असतानाही तालुक्यात इमारतींच्या कामांवर अल्पवयीन परप्रांतीय मुले मोठ्या प्रमाणावर रोजगार( काम) करीत असल्याचे चित्र आहे.तालुक्यात परप्रांतीचा येणारा लोंढा थांबवणे गरजेचे असून परप्रांतीयांचा तालुक्यात येणारा लोंढा कधी थांबणार असा स्थानिक बेरोजगारांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे.
-----------------
परप्रांतीयांची होतेय मुजोरी
तालुक्यात परप्रांतीय रोजगारासाठी आले असले तरी अनेक वेळा स्थानिक बेरोजगार तसेच परप्रांतीय बेरोजगार यांच्यात वादावादी होत आहेत.परिणामी परप्रांतीयांची मुजोरी वाढत चालली आहे.भोर तालुक्यातील येणाऱ्या परप्रांतीयांची भोर पोलिसांनी माहिती घेऊन त्यांची नोंद घ्यावी तसेच त्यांच्या होणाऱ्या हालचालींवर  लक्ष ठेवून चौकशी करावी अशी मागणी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार यांच्याकडून होत आहे.

To Top