भोर ! महास्वच्छता अभियानाने भोर शहर काही तासात झाले चकाचक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले असून या अभियानामुळे भोर शहर काही तासात चकाचक झाले.हा उपक्रम महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री विभूषित महाराष्ट्र भूषण डॉ दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या नेतृत्वात राबविण्यात आला. 
             यावेळी भोरचे तहसीलदार सचिन पाटील, भोर नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरुळीकर, नगराध्यक्षा निर्मलाताई आवारे आणि सर्व  नगरसेवक यांच्या उपस्थितीत चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुड पुतळ्यापासून अभियानास सुरुवात झाली .यावेळी यामध्ये भोर, वेल्हा तालुक्यातील ८५० स्वंयसेवकानी सहभाग नोंदविला. एकूण ३५ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.सर्व सदस्यांनी मिळून अवघ्या चार तासात संपूर्ण भोर शहरातील पेठा, एस टी स्टँड, एस टी डेपो, ग्रामीण रुग्णालय, तहसील कचेरी, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, वनविभाग कार्यालय, बाजारपेठ, स्मशानभूमी आणि शहराच्या आसपासचा सर्व परिसर स्वच्छ केला.संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे सर्वजण सदस्य आहेत अशा भावनेतून स्वच्छता राखण्याचे काम करण्यात यावे असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
To Top