सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासुन फक्त ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतुन तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर-कंरजेपुल येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना प्राप्त झाली आहे.
नुकतेच राज्य शासनाकडून याची देयके
ही माहिती त्यांना माहिती अधिकारात उपलब्ध झाली. त्यात धक्कादायक असे की या खर्चाची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास १९ लाख ७४ हजार रुपये जनतेच्या खिशातला शासकीय पैशाची वारेमाप उधळपट्टी केल्याचे दिसुन येत आहे.त्यामुळे सर्वसामन्याच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकुश लावेल व हे सरकार फक्त जाहिरातबाजी न करता खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.