सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर- वाघळवाडी येथे रवी गिरीचे पानटपरी वजा दुकान आहे.दिव्यांग मदत केंद्र संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आनिल मेमाणे हे नेहमी या भागात आले की रवीला भेटल्याशिवाय जात नाहीत.
अनिल मेमाणे यांनी आपल्या शब्दात मांडलेली रवी गिरीची व्यथा....मी नेहमीच बारामतीला जायच म्हटल की कितीही बिझी शेड्युल असो त्यातूनही एक मिनिट का होईना आपल्यातीलच एक दिव्यांग बांधव रविंद्र गिरी याच्याकडे थांबतोच...
एक हात व दोन पायाने अपंग असलेला हा मित्र. नेहमीच मीच काय कोणीही आपल्यातील दिव्यांग त्याच्याकडे गेल्यावर कधीच मानपान चहापान केल्याशिवाय आजिबात सोडत नाही....पण नियतीचाही अजब खेळ बघा ना....??....
परवा खुप दिवासांनी त्याच्याकडे जाण्याचा योग आला...म्हणजे मीच इंदापूरहून एक कार्यक्रम आटपून रात्री आठ साडे आठच्याच्या सुमारास त्याच्याकडे थांबून नेहमी प्रमाणेच अस्थेने विचारपूस केली .काय रवि कस.. काय. चालय......
काही नाही साहेब बसलोय निंवात..म्हणत..त्याने नेहमीप्रमाणेच चहा घेणार का म्हणून विचारल..मी नको नको म्हणत त्याच्या दुकानात व त्याच्या चेहर्यावर नजर फिरवली..काहीतरी खुप बदल झाल्यासारख वाटल म्हणुन न राहवताही त्याला विचारल...काय झालय...दुकान सगळ मोकळ मोकळ केलय...चेहरा पडलाय...काय टेन्शन मधेय का...??? नाही साहेब काही नाही म्हणत..खोट खोट हसतमुख चेहर्याने त्यांन काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत..म्हटल....काहीनाही हे रोजच......
त्यावेळी मात्र मला तो नेहमीचाच रवि वाटला नाही....
म्हणून मुद्दाम फोर्स करून विचारल असता....
त्याचा चेहरा लगेचच पडला...काहीक्षण त्याच मन गहिवरून आल..भरून आलेल्या त्याच्या डोळ्यात पाहताना...मलाही काहीक्षण काहीच सुचेना...मी दिव्यांग साठी काम करत असतानाच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीतील ही पहीलीच अशी घटना की मनाला चटका लावून गेली........तो म्हटला.
काय सांगू साहेब....खुप दिवस फिरलेत...खायला देखील महाग झालोय.....करोनाच्या अगोदर आपण एक हाॅटेल सुरू केल होत...त्यात मी स्थानिक पतसंस्थेच्या माध्यमातून दोन आडीच लाख रूपये गुंतवले..पण करोना सारख्या महामारीत ते देखील देखील उद्वस्त झाल...पण आता संस्थेचे वसुली अधिकारी सारखा तकदा लावतात....लवकर भरून टाका....मार्च एन्डींग आलाय....
त्यात करोना काळा पासून स्थानिक मित्रवर्गच परतीच्या सबबीवर मदत करतोय...त्यांचेही हातुसणने..खुप झालेय....त्यांचा सतत तकदा..लवकर दे....नाहीतर बघ....? सारख फोन करून...दुकानात येऊन खुप बोलतात....काही करू काहीच सुचत नाही साहेब....जगण्याची इच्छाच उरली नाही...पण मरण्याने सार प्रश्न सुटणार नाहीत म्हणून तग धरून हाय.....या त्याच्या सांगण्याने काहीच सुचत नव्हते....फक्त ऐकून घेत शांत उभा होतो.....
साहेब आज महीना घरात खायला देखील काहीच नाही...घरात वयस्कर आजी सतत आजारी...तिचा दवाखाना....एक तर दुकानात काहीच माल नाही...फक्त सकाळी सकाळी सातला दुकानात येऊन बसतोय..ते रात्री दहा पर्यंत.....?मग मी म्हटल...घरीच बसायच थोडे दिवस..तर तो बोला...साहेब आजुन घरात काहीच माहित नाही ..माझ्यावर हे संकट आलय ते...घरातील मी कोणालाच दुकानावर येऊ देत नाही...
नाहीतर आणखी टेन्शन घेऊन दुसराच कुटाना होयचा...म्हणून जात नाही घरी....रोजचाच नीतिनियम पाळून येतोय....त्यात घरी जरी बसल तरी देणेकरांना वाटत...मी मुद्दाम घरी दुकान बंद करून बसलोय. ...ते घरी येऊन अब्रु जाण्यापेक्षा इथेच बसलेल बर.......मी बोलो काय रवि काय अवस्था करून घेतलीय ही.....
मग त्यांने माझ्यासमोर एक फाईल मांडली..त्या फाईलमधील मी निवेदन चाळली...एक आपल्या खासदार. सुप्रियाताई सुळेंना लिहलय..दुसर विरोधी पक्षनेते आजिदादा पवार..याना लिहय..व एक आपले जेष्ठ नेते .शरद पवारसाहेब यांना लिहलय..कोणत्याही स्वरूपातून अर्थिक मदत मिळणे बाबतची ही निवेदन पत्र आपण लवकरच त्यांना देणार आहोत...बघू काय होतय का म्हणत तो बोला..जर इथून प्रश्न नाही सुटला तर मुंबईत मंत्रालयात जाऊन काही मार्ग निघतोय का बघाव लागेल....खरोखरच मित्रांनो ही त्याची झालेली दैनिय अवस्था पाहून खूप खूप अस्वस्थ झालो...रात्रभर त्याच्या विचाराने कशातच लक्ष लागत नव्हत..म्हणून मनात विचार आला...याच जिवण पूर्वपदावर आणण्यासाठी आपणच पुढे आले पाहीजे...हा माणूस कोणापुढे हात पसराणारा नाही..तेव्हा आपणच. एक हात मदतीचा म्हणून..याच्या दुकानात माल भरण्यापुरती तरी मदत करून याला यातून बाहेर पडण्यास मदत करू..शेवटी काय ओ..माणूस आज आहे तर उद्या नाही...अन् कितीही केल तरी शेवटी दिव्यांगाची मदत दिव्यांगानेच केली पाहीजे... एकमेकांना आधार आपणच दिला पाहीजे..शेवटी वेळ ही कोणावरही येऊ शकते..