चित्तथरारक....! संतोष म्हस्के ! मांढरदेवीला निघालेल्या बारामतीच्या स्कुल बसचा ब्रेक अचानक फेल झाला...अनं पुढे काय घडले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी 
कर्मवीर क्लासेस मोरगाव ता.बारामती येथील ३४ विद्यार्थ्यांना मांढरदेवीचे दर्शन करून भोर मार्गे रायगडला जात असताना चौपाटी (भोर )येथे बसचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्याने ड्रायव्हरने स्वतः गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन मोठ्या दगडींच्या उट्या लावून थांबवल्याने ३४ विद्यार्थी बालम बाल बचावले.
           भोर चौपाटी येथून रायगडला जाताना बस एमएच १२ एचसी ९११९ हीचा ब्रेक फेल झाल्याचे अचानक ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने ड्रायव्हरने आरडा ओरडा करीत शेजारील रस्त्यावरून लोकांना सावध करीत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच गाडीतून उडी मारून स्वतःच रस्त्याच्या शेजारील दगडी जमा करून टायरला नागरिकांच्या साह्याने दगडींच्या उट्या लावत गाडी थांबवली. बस मधील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत.हीच घटना भोर पासून रायगडला जाताना वरंधा ता.भोर घाटात घडली असती तर मोठा अपघात होऊन अनर्थ झाला असता. भोर पोलीस सुनील चव्हाण ,शौकत शेख  यांनी घटनास्थळी पोहोचून बस चालक तसेच विद्यार्थ्यांना धीर देत तात्काळ मदत करून रस्त्यावर झालेले ट्राफिक बाजूला करून रस्ता मोकळा केला.
To Top