खंडाळा ! दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार लोणंद येथील राज्यस्तरीय 'शरद कृषि प्रदर्शनाचे' उद्घाटन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद : प्रशांत ढावरे
लोणंद येथील बाजारतळावर आज पासून भरत असलेल्या राज्यस्तरीय 'शरद कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच यावेळी अधुनिक भगीरथ म्हणून ओळखले जाणारे विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि जननायक आमदार मकरंद पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ग्रीनफिल्ड ॲग्रोमाॅलचे चेअरमन अभिजीत घोरपडे यांना शरद कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
           लोणंद येथे भरत असलेल्या 'शरद कृषि प्रदर्शन'चे हे चौथे वर्ष असून आज दिनांक ०५ फेब्रुवारी ते ०९ फेब्रुवारी असे पाच दिवस हे प्रदर्शन असणार आहे. या राज्यस्तरीय प्रदर्शनाचे आयोजन सुवर्णगाथा प्रतिष्ठाण लोणंद, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर प्रतिष्ठाण लोणंद, ग्रीनफिल्ड कृषि माॅल यांनी केले आहे. लोणंद येथील शरद कृषि प्रदर्शनाला हजारोंच्या संख्येने फलटण खंडाळा तालुक्यातील शेतकरी तसेच अन्य भेट देत असतात.  या कृषि प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहीती स्थानिक पातळीवर मिळणे शक्य होते. तसेच शेतीशी संबंधित पिकांचे नवे वाण येथे शेतकऱ्यांना पहावयास मिळतात. याचबरोबर अनेक गृहोपयोगी वस्तू तसेच खाद्यपदार्थांचे विविध स्टाॅल्स , बचत गटांचे स्टाॅल्स ,मनोरंजनाचे विविध प्रकार याचीही रेलचेल या प्रदर्शनात असते.
             शेतकऱ्यांच्या साठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे असणारे हे कृषि प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी विविध पिक स्पर्धांसह डाॅग शो, शेळी-मेंढी, म्हैस, घोडा आदी पशू पक्षांच्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर युथ फेस्टिव्हल, होम मिनिस्टर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या प्रदर्शना दरम्यान करण्यात येणार आहे.
              या प्रदर्शनाचे निमंत्रक सुवर्णगाथा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष डाॅक्टर नितीन सावंत यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाला भेट देऊन शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहीती घेवुन आपली शेती अधुनिक करून शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढवावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी सुवर्णगाथा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष डाॅक्टर नितीन सावंत, उपाध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, सचिव गजेंद्र मुसळे ,खजिनदार मयुरराज गायकवाड, विश्वस्त नगरसेवक सागर शेळके , संभाजीराव घाडगे, योगेश क्षीरसागर, हणमंतराव शेळके, शशिकांत जाधव, रमेश धायगुडे, ज्ञानेश्वर ससाणे, राहीद सय्यद आदींनी मेहनत घेतली आहे.
To Top