सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद नगरपंचायत हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना कळविणेत येते की, आपणांकडे असणारा नगरपंचायत कराची थकबाकी, मालमत्ता कर , पाणीपट्टी कर, नगरपंचायत गाळा भाडे, तसेच नगरपंचायती कडील इतर देणी त्वरीत नगरपंचायत कार्यालयात जमा करावीत आज दिनांक १४ फेब्रुवारी पासुन वसुली अभियान आपले दारी राबविणेचा उपक्रम सुरु करणेत आलेला असुन यामध्ये तीन पथके नियुक्त करणेत आलेली आहेत.
जे मालमत्ता धारक मालमत्ता कर, पाणीपट्टी कर भरणार नाहीत त्यांचेकडील पाणी कनेक्शन त्वरीत बंद केले जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. आज झालेल्या मोहिमेत चार मालमत्ता धारकांची पाणी कनेक्शन बंद करणेत आलेली आहेत. ही कारवाई टाळणेसाठी आपण आपलेकडील नगरपंचायत कर त्वरीत जमा करावा, अन्यथा नगरपंचायती कडुन यापुढे पाणी कनेक्शन बंद करणेचे कारवाई सोबत अधिनियमान्वये जप्ती बाबतची कडक कार्यवाही प्रस्तावित करणेत येईल याची सर्व मालमत्ताधारकांनी नोंद घ्यावी. आपण आपला कर नियमित व वेळेत भरुन नगरपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी केलेले आहे.
COMMENTS