कौतुकास्पद ! सदोबाचीवाडी येथील धुमाळ कुटुंबातील नातवांनी आजही जपली आहे ...आजोबांनी ४० वर्षांपूर्वी सुरू केलेली अनोखी प्रथा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथील सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक संचालक बबुराव दादा धुमाळ यांनी ४० वर्षापुर्वी महाशिवरात्री निमित्त नीरा- बारामती रस्त्यावरील वाहन चालकांसाठी  मोफत उसाचा रस वाटपाची प्रथा पाडली होती. आज ४० वर्षानंतरही सदोबाच्यावाडीचे उपसरपंच व बबुराव दादा धुमाळ यांचे नातू ऋषिकेश धुमाळ यांनी आजही ही प्रथा अखंडित सुरू ठेवली होती. 
         मध्यंतरी ह्या प्रथेला खंड पडला होता परंतु आठ वर्षा पासुन धुमाळ कुटुंबियांनी ही प्रथा पुन्हा सुरु केली आहे.
आज महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिवसभर वडगाव निंबाळकर येथील इरिगेशन बंगला ठिकाणी रस्त्याने ये जा करणाऱ्या बाराशे भाविकांना धुमाळ कुटुंबियांच्या वतीने उसाच्या रसाचे वाटप करण्यात आले. बबुराव दादा धुमाळ यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव अनिल धुमाळ यांनी ही प्रथा सुरू ठेवली होती. त्यानंतर आता त्यांचे नातू ऋषिकेश धुमाळ यांनी ही प्रथा सुरू ठेवली आहे.नीरा-बारामती रोडलगत धुमाळ गोडाउन इरिगेशन बंगल्या शेजारी ओम रसवंती या ठिकाणी हा उपक्रम राबवला जातो.
या वेळी अनिल धुमाळ, सदोबाचीवाडी उपसरपंच ऋषिकेश धुमाळ, गौरव धुमाळ, वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य  अनिल भोसले, बाळासो जाधव, प्रशांत मोरे, दत्ता वाबळे, योगेश जाधव, महेश जगताप उपस्थित होते.
To Top