बारामती ! असं काय घडलं की..... 'सोमेश्वर' कारखान्याचं ऊस गाळपाचं घोडं मार्चमध्येच आडलं....

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : महेश जगताप
चालू गळीत हंगामात उसाचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याला संपूर्ण उसाचे गाळप करणे जिकरीचे आहे असे बोलले जात असताना परिस्थिती मात्र वेगळी दिसत आहे. गेल्या अनेक वर्षात पाहिल्यांदाच सोमेश्वर कारखाना उसाअभावी मार्च महिन्यात बंद करावा लागत आहे. याबाबत नुकताच कारखाना प्रशासनाने कारखाना मार्चचा शेवटचा आठवडा अथवा एप्रिल चा पहिला अडवड्यात बंद होणार आहे. याला दुजोरा दिला आहे. 
            गेल्या तीन चार वर्षात पर्जन्यमानाने चांगली हजेरी लावल्याने उसाचे पीक घेण्याकडे सभासदांचा कल वाढला आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात २८ हजार सभासदांनी व बिगर सभासदांनी तब्बल ४२ हजार एकरांवर ऊसाची लागण केली. चालू गळीत हंगामात सोमेश्वरकडे सभासदांचा ३७ हजार एकारांवरील तर बिगर सभासदांचा ५ हजार एकारांवरील तब्बल पंधरा ते साडेपंधरा लाख टन ऊस गळापासाठी उपलब्ध झाला. अशीच परिस्थिती मागील काही वर्षी देखील राहीली होती. उसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता संचालक मंडळाने गेल्या हंगाम संपल्यावर  विस्तारीकरणाचे काम हातात घेतले.  सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी संचालक मंडळाने बारकाईने लक्ष घालून डिसेंबरमध्येच नवीन विस्तारीकरण चालू केले मात्र हे करत असताना आपण गाळपासाठी गृहीत धरलेला ऊस आपल्याकडे गाळपासाठी उपलब्ध आहे का याकडे संचालक मंडळाबरोबर शेतकी विभागाचे देखील पाहणे गरजेचे होते. सातारा जिल्ह्यातील शरयू , श्रीदत्त शुगर आणि स्वराज खाजगी कारखान्यांनी या हंगामात सोमेश्वरच्या कार्यकक्षेत्रातील तब्बल सव्वा ते दीड लाख टन ऊस पळविला. तर यावर्षी सोमेश्वरकडे आडसाली उसाचे १८ हजार एकरांवरील ऊस गळापास
 उपलब्ध होता. सरासरी एकरी ५२ टन बसणारे आडसाली उत्पादन चालू हंगामात एकरी ३ ते ४ टनाने घटल्याने या ठिकाणी एक लाख टनाचा फटका बसला असा मिळून या हंगामात सव्वादोन लाख ते अडीच लाख टन उसाचा फटका 'सोमेश्वर'ला बसला आहे. 
         त्यातच कार्यकक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढले या भीतीने सोमेश्वरकडे नोंदविलेले ऊस सभासदांनी कमी दरात का होईना इतर कारखान्यांना घातला. त्यामुळे एकीकडे सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी ६४ कोटी  रुपये खर्च करून विस्तारीकरणाचे काम केले मात्र टनेज चा फटका तसेच बाहेरील कारखान्याला ऊस गेल्याने  विस्तारीकरणाचा म्हणावा तेवढा उपयोग झालाच नाही का? असे म्हणटले तर वावगे ठरणार नाही. 
               त्यातच हंगाम चालू होताना  कारखान्याने करार केलेल्या जवळपास पन्नास टोळ्या ऊस तोडण्यासाठी कारखान्यावर आल्याच नसल्याने त्याठिकाणी ऊस वाहतुकदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पर्यायाने ऊसतोडणी अभावी कमी ऊस आल्याने पर्यायाने कारखान्याचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकी विभागाच्या ऊसतोडीच्या नियोजनात काही चुकतेय का हे पाहणे देखील गरजेचे आहे. तर गेल्या दोन तीन वर्षांपासून ऊसतोडणी कामगारांचा नवीनच फंडा आला आहे. अगोदर 'उसाला काडी मंगच कोयता' लावला जात आहे. त्यामुळे उसाला आग लावून ऊस तोडल्याने काही प्रमाणात का होईना सभासदांचे नुकसान होत आहे. 
---------------------------
गेल्या वर्षी सप्टेंबर अखेर पडलेला पाऊस त्यामुळे ऊस उगवण क्षमतेवर परिणाम झाला. पर्यायाने सरासरी एकरी ५२ टन भरणारे आडसाली उसाचे वजन एकरी चार टनाने घटले. यामध्ये जवळपास एक लाख टनाचा फटका बसला आहे. त्याचबरोबर भागाच्या राकमेबाबत मागील तीन वर्षाची सरासरी काढून एक एकराला एक शेयर कपातीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. 
राजेंद्र यादव 
कार्यकारी संचालक
To Top