Daund breaking ! गळफास घेत पती-पत्नीची आत्महत्या : दौंड तालुक्यातील पारगाव येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
दौंड : प्रतिनिधी 
केडगाव ता. दौंड पारगाव तालुका दौंड येथील दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. 
         विकास पोपटराव जगताप (वय ४२) व त्यांची पत्नी जयश्री विकास जगताप ( वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे जयश्री या विकासच्या मामाची मुलगी असल्याने दोघांचा प्रेम विवाह झाला होता. सदर घटना गुरुवारी (दि. ९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गुरुवारी सायंकाळी जेवण झाल्यानंतर जगताप दाम्पत्य आपल्या खोलीमध्ये झोपायला गेले. शुक्रवारी सकाळी उशीर झाला तरी दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबीयांना शंका आल्याने दरवाजा वाजवला. परंतु आतून प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शेजारील दोन खोल्यांमध्ये घरातील लोखंडी चॅनलला हे दाम्पत्य गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. दोघांनी आत्महत्या नेमकी कशामुळे केली याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.
         यवत पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, शवविच्छेदन करण्यात आले.
To Top