सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिराच्या मुलींनी राज्यस्तरीय रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. लातूरचे जिल्हा क्रिडाअधिकारी यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत कौतुकाची थाप टाकली.
लातूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व बारामती तालुका आजी-माजी सैनिक संघटना, सोमेश्वरनगर यांच्यावतीने स्वातंत्र्य विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर मधील राज्यस्तर मैदानी स्पर्धेत 4×400 मीटर धावणे रिले मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचा रनिंगशूज देऊन सन्मान करण्यात आला. व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या दरम्यान जगन्नाथ.लकडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले व भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा व्यक्त केली. याप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक .ऋषिकेश गायकवाड, सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, बाळासाहेब गायकवाड़, माजी उपसरपंच निलेश गायकवाड, राजाराम शेंडकर, पंकज कारंडे, युवराज चव्हाण,गणेश शेंडकर,रविंद्र कोरडे,सोमेश्वर स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष भाऊसाहेब लकडे .शशिकांत जेधे, क्रीडा शिक्षक.डी.वाय. जगताप सर व अन्य मान्यवर उपस्थित होते.