सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे आज जलजीवन योजनेअंतर्गत येणाऱ्या स्वच्छ पाणीपुरवठा टाकीचे भूमिपूजन पार पडले. आता ग्रामस्थांसह जनावरांना देखील फिल्टरचे पाणी मिळणार आहे.
वाणेवाडी गावाला जलजीवन योजनेअंतर्गत २२ कोटी रुपयांच्या स्वच्छ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून सुमारे साडेतीन एकरामध्ये या योजनेच्या पाणी टॅन्कचे काम सुरू आहे. या पाणीपुरवठा योजनेत स्वच्छ पाणी एका मोठया टाकीत येणार असून तेथून प्रत्येक वार्डनिहाय पाणीपुरवठयासाठी वेगळ्या टाक्या बांधण्यात येणार आहेत.
आज वाणेवाडी येथे पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे,
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, मा. सरपंच दिग्विजय जगताप, खरेदी विक्री संघाचे संचालक विक्रम भोसले, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, पोपटराव भोसले,धन्यकुमार जगताप, सरपंच गितांजली जगताप, उपसरपंच धीरज चव्हाण, सर्व सदस्य मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------
गितांजली जगताप-सरपंच
वाणेवाडी गावासाठी स्वच्छ पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित करून ग्रामस्थांना स्वच्छ पाणी देण्याचा सदस्य मंडळाचा मानस आहे.
COMMENTS