सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरोळ : प्रतिनिधी
यड्राव येथील शरद इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रा सौ माधुरी सचिन माळी व लायन्स क्लब शिरोळचे अध्यक्ष सचिन माळी यांनी स्वखर्चातून व लायन्स क्लबच्या माध्यमातून येथील राजश्री शाहू नगर वाचनालयास संगणक भेट दिला.
शाहू वाचनालयास संगणकाची आवश्यकता होती याकरिता लायन्स क्लबचे अध्यक्ष व वाचनालयाचे संचालक सचिन माळी यांच्याकडे संगणकाची मागणी करण्यात आली होती वाचनालयाची निकड लक्षात घेऊन शरद इंजीनिअरिंग कॉलेजच्या प्रा सौ माधुरी माळी व सचिन माळी यांनी स्वखर्चाने वाचनालयास संगणक देऊन वाचनालयाची आवश्यक असणारी गरज पूर्ण केली आज वाचनालयात संगणक भेट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला
स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष प्रा आण्णासाहेब माने गावडे यांनी स्वागत केले लायन्सचे अध्यक्ष सचिन माळी यांनी प्रस्ताविक केले. या कार्यक्रमास लायन्स क्लब शिरोळचे सचिव सुनिल देशमुख सदस्य रामप्रसाद पाटील महेश मोरे प्रवीण चौगले अभिजीत गुरव सनीसिंग पाटील बुधाजी चुडमुंगे वाचनालयाचे कार्यवाह धनाजीराव जाधव संचालक आनंदराव माने देशमुख अशोक गंगाधर नानासाहेब जाधव अशोक गंगधर चंद्रकांत माने गावडे रामचंद्र पाटील आप्पासो पुजारी आप्पासो गावडे संचालिका सौ जयश्री पाटील ग्रंथपाल संभाजी चव्हाण सेवक वर्ग वाचक हितचितंक उपस्थित होते. वाचनाचे उपाध्यक्ष एम एस माने यांनी आभार मानले.