सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील चिखलावडे ता.भोर येथे जमीन गट नंबर ६२ मधील १ लाख ६५ हजार किमतीची २१६ ब्रास माती चोरी प्रकरणी चिखलावडे येथील तिघा जणांवर भोर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलावडे ता. भोर येथील तीन जणांनी गट नंबर ६२ मधील २१६ ब्रास १ लाख ६५ हजार किमतीची माती व सदर जागेतील २५ ते ३० झाडे तोडून फेब्रुवारी महिन्यात नुकसान केले प्रकरणी भोर पोलिसात प्राजक्ता श्रीकांत भालेराव रा. ब्रह्मा सोसायटी ,सावरकर नगर ,माणिक बाग वडगाव बुद्रुक यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राहुल मखरे ,उद्धव गायकवाड करीत आहेत.